मित्राअॅग्रो बद्दल
मित्रा अॅग्रोचे संस्थापक, श्री.देवनीत बजाज हे लॉस एंजेलिस, अमेरिकेत राहत होते तेव्हा त्यांना आढळले की तेथील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक प्रमुख यंत्र आहे, ते म्हणजे फवारणी यंत्र. त्यांना वाटले की ही फवारणी यंत्रे या आधुनिक युगात भारतातील शेतकर्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यास मदत करेल आणि शेतकऱ्यांचे काम सोपे करेल या कल्पनेतून मित्रा अॅग्रोची भारतात स्थापना झाली.
अल्पावधीतच, मित्रा अॅग्रो भारतातील सर्वात यशस्वी फवारणी यंत्रे उत्पादक बनली आहे जसे की ऑर्चड फवारणी यंत्र, बूम फवारणी यंत्र, डस्टर आणि रोटाव्हेटर्स यांसारख्या विविध फवारण्यांसह, शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीखालील जमिनीचे संरक्षण करण्यात मदत करत आहोत.